अनाम प्रेम
३१ डिसेंबर २००९ ची मध्यरात्र व १ जानेवारी २०१० ची पहाट
प्रिय बंधु व भगिनी,
प्रेम, प्रणाम व आल्हादभाव,
गुरुवार, ३१ डिसेंबर हा २००९ चा शेवटचा दिवस! प्रत्येकजण ३१ची रात्र – १ जानेवारीची पहाट, नव्या वर्षाचे स्वागत गाणीबजावणी, फटाक्यांच्या जल्लोषात आनंदाने करतो. पण आपली पृथ्वीमाता आनंदी आहे का? परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कृती म्हणून ओळखला जाणारा माणूस सुखापाठी धावत असताना निर्व्याज प्रेम आणि भ्रातृभाव विसरत चालला आहे. साहजिकच, प्रत्येक घरात असमाधान आणि वैद्यकशास्त्राला आव्हान देणारे आजार घुसत आहेत. शांतता आपल्याला चकवा देत आहे. भांडणतंटे-मारामाऱ्या नाहीत, म्हणजे शांतता झाली का? आंतरिक शांती, प्रसन्नता आपल्याजवळ आहे काय? ज्याप्रमाणे आपले मन शांत नाही त्याप्रमाणेच पृथ्वीचा आत्माही शांत नाही. म्हणूनच, आपल्याला वरचेवर वादळं, प्रलय, बदलणारे ऋतुचक्र यांना तोंड द्यावे लागत आहे.
‘युनेस्को’ने ३१ डिसेंबर ‘स्पिरिच्युअल डे’ म्हणून घोषित केला आहे. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक किंवा पारमार्थिक. अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे धर्म नव्हे. तुम्ही धार्मिक नसाल किंवा तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल पण तुम्ही आध्यात्मिक आहातच, ईश्वराचा अंश तुमच्यामध्ये आहे. ते एक चैतन्य आहे. तुमच्यामधून चैतन्य व ईश्वरी अंश गेला की तुमचे शरीर म्हणजे केवळ कलेवर – मृत्तिकाच! चैतन्य कधीही मरत नाही. हे चैतन्य किंवा ही शक्ती शरीर टाकल्यावर दुसरा आकार किंवा आकृती घेते. हा पुढचा आकार किंवा आकृती तुम्ही हा देह असताना कसे वागलात याच्यावर अवलंबून असते, असो. तर या जन्मीचे आपले वागणे आध्यात्मिक व पारमार्थिक असायलाच पाहिजे. चांगले वागणे म्हणजे कोणत्याही धर्माचे काटेकोर पालन नव्हे! तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही कोणत्याही धर्माचे नव्हता. नंतर ही धर्माची वस्त्रे तुमच्या अंगावर आली! जाताना ही वस्त्रे टाकणारच. आणि म्हणून धर्मापेक्षा आतील चैतन्यावर भर द्यायला हवा. मग आपोआपच मनाला शांती मिळेल, कुटुंबात शांतता येईल आणि युनेस्कोने घोषित केलेला १ जानेवारी हा दिवस खऱ्या अर्थी ‘शांतिदिन’ किंवा ‘जागतिक कौटुंबिक दिवस’ म्हणून साजरा होईल.
अनामप्रेमींचा असा विश्वास आहे की आमच्या सद्गुरुंच्या – श्री सद्गुरु अडाणेश्वरांच्या आशीर्वादाने जगात शांतता येईल. म्हणून ह्या आध्यात्मिक दिवशी – ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी म्हणजेच विश्वकौटुंबिक दिवशी आपण आम्ही अडाणेश्वरांचे महात्म्य व स्तोत्रवाचन, होम करणार आहोत. श्री सद्गुरु अडाणेश्वर हे विश्वाचे निर्माते व नियंते आहेत. तेच या सृष्टीचे उगम व अंत! आदिपुरुष! म्हणून त्यांना आर्ततेने व जिव्हाळ्याने आळवायचे – प्रत्यक्ष अग्नीसमोर! अग्नीमुळेच माणसाच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाला. अग्नीविषयी मानवाच्या मनात दोन प्रकारच्या भावना आहेत. अग्नीमुळे जे लाभ होतात, त्याबद्दल कृतज्ञता आणि दुसरा भाव म्हणजे त्याची विनाशशक्ती! म्हणून अग्नीला सर्व मानवधर्मात पवित्र समजले जाते. या अग्नीसाठी ‘अनाम प्रेम’ होम करणार आहे. या होमामध्ये या सर्वांनी आपले लोभ, क्षोभ व व्याधी टाकायच्या. गेली सहा वर्षे हा प्रयोग चालला आहे व बऱ्याच जणांनी त्यांची जुनी कात टाकून एक आध्यत्मिक क्रांती व शांती मिळाली आहे. हा अग्नी, दिवस आणि रात्र याच्या मध्यभागी म्हणजेच शून्यप्रहराला प्रज्वलित होणार आहे म्हणून शेवटी ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील १८०० वी ओवी लक्षात ठेवावी –
“किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ (१८००)” – फार काय सांगायचे! स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकात रहाणारे सर्व प्राणिमात्र सर्वसुखाने परिपूर्ण होऊन आदिपुरुषाच्या भजनी निरंतर राहावेत.
– यासाठी हा होम.
यावेळी श्री सद्गुरु अडाणेश्वर साक्षी असतील! तरी श्रद्धेने व मांगल्याने यावे. ही होमाची जाहिरात नाही. प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून सांगणे. नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरला संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात होईल. रात्री महाप्रसादानंतर होम व इतर कार्यक्रमास प्रारंभ होईल. विशेष काही सांगायचे नाही. आपण येणार असाल तर पूर्वसूचना देऊन उपकृत करावे.
कार्यक्रमाचे स्थळ: आझाद भवन, मॅजेस्टिक हॉटेलसमोर, पुंडलिक नगर, पोरवरीम, गोवा.
कार्यक्रमाची रुपरेषा नेहमीप्रमाणेच.
प्रेम, प्रेम, प्रेम व ॐ
श्री. चिंतामण सामंत श्री. अनिल देसाई.
लक्ष्मी व्हिला, तोंका मिरामार कलंगुट, गोवा.
पणजी, गोवा. 09420974455
0832-2465849 / 09850459136 0832-2276189 / 0832-2402591